- रॅपिड अँटिजन तपासणी शिबिराचे आयोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मे. २०२१) :- १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ओम साई ग्रुप, तापकीरनगर यांच्यावतीने जिजामाता हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १) रोजी रॅपिड अँटिजन तपासणी शिबिर आयोजित केले होते.
त्यास नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपली कोरोना तपासणी करून घेतली. त्यात ८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. पॉझिटिव्ह रुग्णांचे जिजामाता हॉस्पिटल अंतर्गत उपचार चालू आहेत. तसेच प्रत्येक तपासणी करणाऱ्यास वाफेची मशीन संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ तापकीर यांच्या वतीने देण्यात आली. सर्व नागरिकांनी आभार व्यक्त केले.