- १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना नोंदणीद्वारेच उद्याही लसीकरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. ३) रोजी नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय व प्रेमलोक पार्क दवाखाना केंद्रांच्या ठिकाणी वर्ष १८ ते ४४ या वयोगटामधील नोंदणी केलेल्या ६०० नागरीक / लाभार्थ्यांपैकी ५८० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
तसेच उद्या (दि. ०४) रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरामध्ये वय वर्षे १८ ते ४४ वयोगटातील ६०० नागरिकांचे लसीकरण करण्याची कार्यवाही नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय व प्रेमलोक पार्क दवाखाना केंद्रांच्या ठिकाणी सुरु राहणार आहे. यासाठी नागरीकांनी / लाभार्थ्यांनी www.cowin.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन Appointment घेणे बंधनकारक आहे. Appointment नसलेल्या नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही.
तसेच (दि. ०४) रोजी लससाठा शिल्लक नसल्यामुळे वय वर्षे ४५ च्या वरील कोणत्याही नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही. फक्त नोंदणी करुन Appointment घेतलेल्या वय वर्षे १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांनी वरील तीन्हीं लसीकरण केंद्राच्या ठिकाणी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत उपस्थित रहावे. नोंदणी न झालेल्या नागरीकांनी लसीकरण केंद्राच्या परिसरामध्ये गर्दी करु नये व सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.