न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २६ डिसें.) :- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणा च्यावतीने बिजलीनगर येथील गणेश मंदिर तसेच तुळजाभवानी मंदिरे पाडण्यासाठी तसेच ब प्रमाणित निष्काशन करण्यासाठी गुरुवार (दि. २७) रोजी मोठा पोलीस बंदोबस्त मागविला आहे.
त्यासंदर्भात तशी हालचालही प्रशासनाकडून सुरू आहे. परंतु, नैसर्गिक न्याय तत्वानुसार सदरची कारवाई एकतर्फी दिसून येत असल्या कारणाने मंदिर प्रशासनाचे पदाधिकारी व घर बचाव संघर्ष समिती समन्वयक यांनी न्यायालयाकडे धाव घेतली आहे. त्यासंदर्भात आता न्यालाययाने दोनही बाजूकडील संबधितांना (दि.३१ डिसें.) रोजी कोर्टामध्ये हजर राहण्यास सांगितले आहे.
त्याचप्रमाणे घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी मुख्यमंत्री कार्यालयासही याबाबत तक्रार दाखल केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयानेही याची दखल घेतली असून, याबाबत गृहखाते आणि नगरविकास खात्यास मुख्यमंत्री कार्यालयाने सूचित केलेले आहे. त्यामुळे प्राधिकरणाने उद्या गुरुवार (दि. २७) रोजी मंदिरांवर “हातोडा” कारवाई करू नये, असे समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. प्राधिकरण प्रशासनास याबाबतची न्यायालयीन कागदपत्रे पोहच झाली असून, न्यायालयीन प्रक्रियेचा त्यांनी सन्मान ठेवावा व अतिक्रमण कार्यवाही करू नये, असे घर बचाव संघर्ष समिती च्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.










