- दीड लाखांपेक्षा अधिक रुग्णांकडून कोरोनावर मात..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात आतापर्यंत २,१४,३९१ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी १,६६.६७९ जण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेऊन बरे झाले. या सर्व १,६६.६७९ होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण केला आहे, अशी माहिती महापालिकेच्या वॉर रूमने दिली.
ज्या रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. इतर कोणताही आजार नाही अशा रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवले जाते. सक्रिय रुग्ण संख्येच्या तुलनेत जवळपास ८० टक्के रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. सुरुवातीच्या काळात आयसोलेशन राहून उपचार घेण्याबाबत नागरिकांमध्ये भीती होती. परंतु आता नागरिक स्वतःहून होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारत असल्याचे दिसून येत आहे.
या माध्यमातून रुग्णांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली जाते. यामध्ये कोणती लक्षणे आहेत. ताप, सर्दी, खोकला याची माहिती घेतली जाते. रुग्णाला काही शंका असल्यास फोन डॉक्टरांना जोडून दिला जातो. यासाठी दहा डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची माहिती कॉल सेंटरला दिली जाते.