- एका भाग्यवान प्लाझ्मादात्याला मिळणार दुचाकी..
- मोहिमेत सहभागी व्हावे; नगरसेवक वसंत बोराटेंचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. मे. २०२१) :- मोशीतील साईनाथ सोशल फाउंडेशनने दोन हजार प्लाझ्मादानकर्ते तयार करण्याचा संकल्प केला आहे. नोंदणीमुळे गरजेनुसार प्लाझ्मा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. दान करणाऱ्यांचीही माहिती संकलित केली जाणार आहे. यासाठी लिंक उपलब्ध करून दिली असून, त्या लिंकवर क्लीक करून फॉर्म भरून प्लाझ्मा दान करू इच्छिणारे आपली नोंदणी करू शकतात.
नगरसेवक तथा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वसंत बोराटे यांनी सांगितले की, आमदार महेश लांडगे यांच्या प्रेरणेतून दोन हजार प्लाझ्मादानकर्ते तयार करण्याचा संकल्प केला आहे. ज्यांना ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, त्यांनी फक्त हा फॉर्म भरून द्यावा. याचा उपयोग भविष्यात लाझ्मा उपलब्ध होण्यासाठी होईल.
नोंदणीसाठी https://forms.gle/9Mm1GHDUEvx7fMr99 या लिंकद्वारे फॉर्म भरण्याची तसेच नगरसेवक वसंतशेठ बोराटे जनसंपर्क कार्यालय मो. ८०५४५०९९९९ वरही सोय करण्यात आली आहे. प्लाझ्मादान प्रोत्साहन म्हणून सर्व प्लाझ्मा दात्यातून एकाला लकी ड्रॉद्वारे दुचाकी देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त प्लाइमादात्यांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन नगरसेवक बोराटे यांनी केले आहे.