- पैशांसाठी छळही केला; पतीसह सासू व इतरांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. मे. २०२१) :- विवाहितेला मुलगा व्हावा यासाठी एका महाराजाच्या सांगण्यावरून सासूने विवाहितेच्या डोक्यावर लिंबू कापणे, महाराजांनी दिलेला अंगारा चहा, नाष्ट्यामधून खाऊ घालणे, असे अघोरी प्रकार केले. आणखी एका महाराजाच्या सांगण्यावरून विवाहितेला रात्र-रात्र एकाच कुशीवर झोपण्यास भाग पाडले.
आरोपींनी विवाहितेकडे लग्नातील मानपानासाठी माहेरहून २५ लाख रुपये आणण्याची मागणी केली. त्यावरून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. याबाबत विवाहितेने पतीला सांगितले. त्यानंतर पतीनेही विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केली. तू मला घटस्फोट दे, नाहीतर तुला व तुझ्या संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकेन, अशी विवाहितेला धमकी दिली.
रहाटणी येथे ५ डिसेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी ३१ वर्षीय विवाहितेने सोमवारी (दि. ३) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती प्रशांत रमेश लोहार (वय ३२), सासू मीना रमेश लोहार (वय ५०), नणंद हर्षदा भूषण मेहता (वय २८, सर्व रा. रहाटणी), यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.