- तरीही बँकेची कागदपत्रे अद्ययावत करण्याच्या सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. मे. २०२१) :- घरेलू कामगार महिलांच्या खात्यावर शासनाचा लाभ अद्याप जमा शालेला नाही. नोंदणी केलेल्यांना अजूनही बँकेची माहीती अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या जात आहे. त्यानंतर शासनाचा लाभ थेट खात्यात जमा होईल, अशी माहिती कामगार उपायुक्त कार्यालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
घरेलू कामगार महिला शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. नोंदणी कधीपासून गृहीत धरायची, या संभ्रमात सध्या कामगार उपायुक्त कार्यालयातील अधिकारी आहेत. त्यामुळे इतरांना लाभ मिळू लागला असतानाही घरेलू महिला कामगार वंचित आहेत. घरेलू महिला कामगारांनी आपल्या बँकेची माहिती अद्ययावत करण्याची सूचना अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बँकेची माहिती नवीन असेल तर कार्यालयात कळविण्याची सूचना केली. त्यानंतर खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यानुसार पिंपरी – चिंचवडमधील घरेलू महिला कामगारांनी बँकेची कागदपत्रे अद्ययावत करायला सुरुवात केली आहे. शहरातील सुमारे ३ हजार ५०० महिलांना त्याचा लाभ होणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.