- पोलिसांकडून आरोपी अटकेत..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. मे. २०२१) :- पुण्यात बुधवार पेठ परिसरातील फरासखाना पोलीस स्टेशनमधील हवालदाराचा गुंडाने चाकूने वार करून हत्या केली. हवालदाराची हत्या झाल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. प्रविण श्रीनिवास महाजन (३४) असं आरोपी गुंडाचं नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
फरासखाना पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या आम्हाला फोनवरून माहिती मिळाली होती. बुधवार केजळे चौकाजवळील ढमढेरे बोळात जाणार्या रोडवर हॉटेलसमोर एका व्यक्तीवर चाकूने वार झाले असल्याचं सांगण्यात आलं होतं. आम्ही काही मिनिटात घटनास्थळी पोहोचलो. यावेळी तिथे हवालदार समीर सय्यद रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. चौकशी केली असताना पव्या महाजनने हल्ला केल्याचे सांगण्यात आले”.
या प्रकरणी आरोपी प्रवीण महाजनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” अशी माहिती श्रीकांत सावंत यांनी दिली. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.