न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ डिसें.) : अशोक सर्वांगिण विकास सोसायटी अंतर्गत आयोजित ‘नवनिर्मित पॅगोडा लोकार्पण सोहळाप्रसंगी‘ पॅगोड्याचे लोकार्पण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या पॅगोडामध्ये ब्रम्हदेशातून मिळालेल्या बुध्दांच्या अस्थींचे प्रत्यार्पित भन्ते नंदमाला, भन्ते नागघोष आणि ब्रम्हदेशातील भन्ते यांचे हस्ते करण्यात आले.
त्याप्रसंगी लोकनेते शरद पवार यांनी आपले मनोगतात ‘देशाच्या संविधानात देशाला नवी दिशा देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. यांनी त्याच्याच कार्याचे ध्येय उराशी बाळगून डॉ. अशोक शिलवंत हे सामाजिक कार्य करीत आहेत. या पुढील त्यांच्या लोकहितासाठी सामाजिक कार्यास त्यांना ताकद देण्याचे काम करणार आहे असे प्रतिपाद पवार यांनी केले’. त्याप्रसंगी त्यांना संस्थेच्या अतिशय मानाच्या व प्रतिष्ठेच्या ‘अशोक रत्न‘ या पुरस्काराने सिक्कीम राज्याचे मा. राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
पुरस्कारास उत्तर देताना शदर पवार म्हणाले की, देशाच्या कानाकोपर्यात सामाजिक भावना जागृत ठेवण्यासाठी मतभेद विसरुन सर्व जाती-धर्मातील लोकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. या छोठ्याशा ठोमसे या गावात सर्व युगपुरुषांचे पुतळे उभारुन, सामाजिक एकोपा जपण्याचे काम डॉ. अशोक शिलवंत यांनी केले आहे. यापुढील काळात माझ्यावतीने या गावास विकासाच्या प्रवाहास आणण्यासाठी प्रयत्न होईल. पुरस्काराचे स्वरुप मानपत्र, सन्मानचिन्ह, सम्राट अशोकाचा मानदंड व महात्मा फुले पगडी असे होते.
या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी रस्ते विकास मंत्री मा. विक्रमसिंह पाटणकर, विद्याभूषण डॉ. प्रशांत पगारे, आचार्य रतनलाला सोनाग्रा, प्रा. आण्णासाहेब क्वाणे, आशपाक मुलानी, प्रतापराव मोहिते, भन्ते नागघोष, भन्ते आनंद, प्रकाश बालवडकर, भगवानराव वैराट, गणेश काकडे, राजेंद्र पाटील, राजेंद्र कर्नावट, प्रणव गायकवाड, आर. जी. गायकवाड, जिल्हा परिषद अध्यक्ष संजिवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद शिक्षण सभापती राजेश पवार, निवृत्त पोलीस अधिकारी एम. बी. चेनीगुंड, जालनाचे सहा. पोलीस उपनिरिक्षक सुरेश डावखरे, मा. दत्ता कोहिनकर इ. मान्यवर आणि मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
प्रास्तविका प्रसंगी डॉ. अशोक शिलवंत व सुलक्षणा शिलवंत-धर यांनी आदरणीय पवार साहेब यांनी आमच्या विनंतीचा मान देऊन एका छोट्याशा गावी येऊन आमच्या आनंदात भर पाडली. त्यामुळे आम्हांला सामाजिक कार्य करण्यास मोठ्या प्रमाणात ऊर्जा प्राप्त झाली असे उद्गार काढले.
तसेच या कार्यक्रमात डॉ. अशोक शिलवंत यांनी समाजकारणासह राजकारणात देखिल वेगळा ठसा उमटविल्याचे मा. राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी सांगितले. ठोमसे या गावी वृत्त प्रसिध्दीस पॅगोडा उभारुन आदरणीय शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण करुन या छोट्याशा गावाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम डॉ. अशोक शिलवंत यांनी केले आहे, असे प्रतिपादन विक्रमसिंह पाटणकर यांनी केले.
या कार्यक्रमात कवी संमेलनाचेही आयोजन केले होते. कवी संमेलनात उध्दव कानडे, चंद्रकांत वानखेडे, भालचंद्र कोळपकर, पुरुषत्तोम सदाफुले, राजेंद्र वाघ, सागर काकडे आदींनी सहभाग घेऊन आपल्या कविता सादर केल्या.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय सामाजिक कार्य करणार्या व्यक्तींचा विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रामुख्याने डॉ. गगन मलिक यांना अशोकविभूषण पुरस्कार आणि मा. प्रविण शिंदे यांना अशोक भूषण पुरस्कार व रामदास महाडिक यांना अशोक मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच आदर्श माता पुरस्कार ने भाग्यश्रीताई पाटील, हिराबाई कुंभारे, जमा हुलगेश चलवादी, मधुमती अशोक कर्नावट, सिताबाई तातु खंडाईत या आदर्श मातांना सन्मानित करण्यात आले. तसेच कमल आई काव्य पुरस्काराने शारदा बडोले, निलेश आगरवाल, बंडा जोशी, सुमित गुणवंत, सुप्रिया वाईकर, बी. डी. गायकवाड, बाबाजी मगदुम यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सत्यसेन शिरसाठे, विकास शिलवंत, सुनिल शिलवंत, अमोल माने, हणमंता माने, शिलरत्न शिलवंत, मयुर शिलवंत, शाम घोडके, विशाल कांबळे, कुलदीप कांबळे, कपिल शेलार, प्रकाश कुंभार, भरत गोगावले, संदीप मकासरे, अमोल इंगळे, मल्हारी गायकवाड, सतिश गायकवाड, नेहा हडावळे, नरेंद्र मोहड, दादा वारभुवन आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कवीवर्य उध्दव कानडे, दयानंद शिलवंत यांनी केले तर आभार अशोक नागरी सहकारी बँकेचे चेअरमन अॅड. राजरत्न शिलवंत यांनी मानले.










