- बाबा कांबळे यांच्या हस्ते एकता रिक्षा स्टँडचे उदघाटन
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ डिसें.) :- महाराष्ट्र रिक्षा पंचायत संलग्न एकता ऑटो रिक्षा स्टँडचे महेशनगर संत तुकारामनगर पिंपरी येथे महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या हस्ते नुकतेच उदघाटन करण्यात आले आहे.
यावेळी संत तुकाराम पोलीस चौकीचे सहा. पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते सार्थ पलांडे, प्रल्हाद कांबळे, बळीराम काकडे, दत्ता भोसले, सदाशिव तळेकर, स्टँड अध्यक्ष अरुण टोपे, उपाध्यक्ष गणेश कुऱ्हाडे, सचिव सुहास जोगदंड, कोषाध्यक्ष शुभम माने, अक्षय साळवे, विशाल परदेशी, अश्रुबा वाघमारे आदी उपस्थित होते.
रिक्षा चालकांना मार्गदर्शन करताना फौजदार निलेश वाघमारे म्हणाले,” नागरिकांना प्रवाशी सेवा देणे ही रिक्षा चालकांची फार मोठी जबाबदारी आहे. या भावनेतून रिक्षा चालकांनी काम करावे, असे झाल्यास रिक्षा चालक व नागरिक यांच्यातील संवाद वाढेल आणि नागरिक रिक्षात आनंदाने प्रवास करतील असे मत निलेश वाघमारे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी लक्ष्मण पवार, अमोल देवकर, बाबा जावळे, तानाजी पवार, विकास वाघमारे, बाळू डोंगरे, मल्लिकार्जुन साखरे, धनंजय चौधरी, सुनील होळकरी यांनी परिश्रम घेतले.










