- पोलिसांकडून तिघांना बेड्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६. मे. २०२१) :- नेहरूनगर येथे मैदानालगत काही मुले मारामारी करत असल्याचे निदर्शनास आल्याने राज्य राखीव पोलीस दलाचे जवान बेरड यांनी गाडी थांबवून त्यांना हटकले. त्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करून फिर्यादीला गाडीवरून खाली ओढले.
जीवे मारण्याच्या उद्देशाने दगड मारून बेरड यांना जखमी केले. तुला आता जिवंत सोडत नाही, असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून आरोपींनी दहशतीचे वातावरण निर्माण केले.
मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. श्रीकांत रावसाहेब बेरड (वय २८, रा. मासुळकर कॉलनी, पिंपरी) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अजिंक्य रामदास नेटके (वय २४, रा. नेहरूनगर, पिंपरी), फिरोज करीम मुजावर (वय २६, रा. अक्षय सोसायटी), गाॅडफ्रे सायमन डिसुजा (वय २५, रा. खराळवाडी, पिंपरी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता ९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.