- पोलिसाने अर्जदाराकडे केली होती दोन लाखांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७. मे. २०२१) :- शस्त्र परवान्याचा सकारात्मक अहवाल पाठविण्यासाठी एका पोलिस कर्मचाऱ्याने अर्जदाराकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. या प्रकरणाची दखल घेत पोलिस आयुक्तांनी संबंधित कर्मचाऱ्याचे तत्काळ निलंबन केले. तसेच या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
पोलिस नाईक सुभाष विलास भैरट नेमणूक – निगडी पोलीस स्टेशन. प्रतिनियुक्ती – पोलिस उपआयुक्त परिमंडळ एक यांचे कार्यालय, असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चिंचवड येथील एका व्यावसायिकाने शस्त्र परवाना मिळण्यासाठी अर्ज केला होता. हे प्रकरण ११ मार्च रोजी पोलिस उपआयुक्त परिमंडळ एक यांच्या कार्यालयात आले. दरम्यान, तेथे नियुक्तीस असलेल्या भैरट यांनी अर्जदाराला तीन वेळा फोन करून दोन लाख रुपयांची मागणी केली. उपायुक्तांकडून शस्त्र परवाना प्रकरणी सकारात्मक अहवाल देण्यासाठी ही रक्कम मागितली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्तांनी भैरट यांचे निलंबन केले.