न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९. मे. २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज रविवारी (दि. ०९) रोजी २०२० जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २४७१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २३०२२३ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २०५०२३ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ३३३९ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ४१ एवढी आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे २९ पुरुष – निगडी (७० वर्षे), वाकड (४० वर्षे), पिं. गुरव (५४, ८०, ५१ वर्षे), पिंपरी (४३, ६०, ५४, ६१ वर्षे), चिंचवड (४४, २७, ८७, ४२, ७५, ६४, ४९ वर्षे), मोशी (३५, ३७, ४० वर्षे), काळेवाडी (४०, ३५ वर्षे), कासारवाडी (५९ वर्षे), भोसरी (६५ वर्षे), पिं. सौदागर (८६, ३५, ७५ वर्षे), चिखली (४४, ६५ वर्षे), दिघी (५२ वर्षे) १२ स्त्री – पुनावळे (८० वर्षे), रुपीनगर (४७ वर्षे), पिंपरी (५८, ६० वर्षे), तळवडे (७२ वर्षे), काळेवाडी (६२, ७१ वर्षे), वाकड (७५, ७६ वर्षे), पिं. गुरव (६२ वर्षे), बोपखेल (७५ वर्षे), चिंचवड (६३ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे १४ पुरुष – कोंढवा (४६ वर्षे), राजगुरुनगर (७१ वर्षे), अहमदनगर (५५ वर्षे), उमरज (५२ वर्षे), खोपोली (४९ वर्षे), पुणे (४७, ५० वर्षे), वडगाव (६७ वर्षे), सनसवाडी (३८ वर्षे), चाकण (४८ वर्षे), देहूगांव (७२, ३२ वर्षे), बालेवाडी (५५ वर्षे), बाणेर (५३ वर्षे) १० स्त्री – पुणे (४०, ४५ वर्षे), शिरुर (६५ वर्षे), राजगुरुनगर (८६ वर्षे), वडगांव (४६१वर्षे), कामशेत (२४ वर्षे), तळेगाव (५६वर्षे), नांदेड (४२ वर्षे), औंध (७२ वर्षे), चाकण (५८ वर्षे) येथील रहिवासी आहे. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात ०७ मृत्यु झालेले आहेत. आज १८ ते ४४ वयोगटातील १५५२ लाभार्थांचे लसीकरण झालेले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ -१८१, ब – ३७७, क – २०७, ड – ३०६, इ – ३२५, फ – २५७, ग – २०३, ह – १६४ एकूण २०२०.