कोणता डोस घेतला? त्याची माहिती सादर करण्याचे निर्देश…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १०. मे. २०२१) :- कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी आपली माहिती तातडीने सादर करावी. लसीचा पहिला डोस, दुसरा डोस घेतल्याचे त्यात नमूद करावे, असे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत.
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवर गट अ ते ड संवर्गात शिक्षक कर्मचाऱ्यासह सुमारे दहा हजार कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोना आजाराचा प्रादुर्भाव आणि प्रसार रोखण्यासाठी महापालिका स्तरावर विविध उपाययोजना युध्दपातळीवर राबविण्यात येत आहेत. महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांचे आरोग्य निरोगी राहावे आणि त्यांचे कोरोना आजारापासून संरक्षण व्हावे, याकरिता महापालिका कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी लसीकरण केंद्रे उभारले आहेत.
जास्तीत जास्त कर्मचारी आणि राज्य शासनाने कोरोनाच्या लसीकरण संदर्भात पालिकेमधील एकूण अधिकारी आणि कर्मचा-यांपैकी किती अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे? याची माहिती महापालिकेकडून मागवली आहे. कोरोना लसीकरण संदर्भात माहिती महापालिका अधिकारी आणि कर्मचा-यांनी महापालिका वैद्यकीय विभागाच्या ई – मेल आयडीवर पाठवावा, असे आवाहन उपायुक्त सुभाष इंगळे यांनी केले आहे