- तब्बल १३ टनापेक्षा अधिकच्या ऑक्सिजनची बचत…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १०. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत वाय.सी.एम.एच., अँटो क्लस्टर, जम्बो कोविड या ठिकाणी प्रामुख्याने क्लिनीकल ऑक्सिजनची आवश्यकता दरम्यानच्या काळात ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत अडचणी निर्माण होत होत्या. त्यासाठी मनपाने स्वतंत्र ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी २४X७ यंत्रणा उभी केली.
त्या यंत्रणेद्वारे मनपा रुग्णालय तसेच आवश्यक त्या खाजगी रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला. याशिवाय वरील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा वापर प्रभावीपणे होण्यासाठी तपासणी करण्यात आली. बारकाईने यंत्रणेवरती लक्ष ठेवून ऑक्सिजनचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची बचत होण्यास मोठी मदत होत आहे.
हॉस्पिटल ऑडीट पुर्वीची खपत ऑडीट नंतरची खपत बचत (KL प्रति तास) बचत प्रति दिन KL Tonnes
अण्णासाहेब मगर १ ०.७५ ०.२५ ६ ६.८९
अँटो क्लस्टर ०.२५ ०.२३ ०.०२ ०.४८ ०.५५
वाय.सी.एम. ०.७५ ०.५५ ०.२० ४.८० ६.१५
एकुण २.०० १.५३ ०.४७ ११.२८ १३.५९