- महापौर उषा ढोरेंचे आयुक्तांना पत्र…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १०. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोना विषाणू संसर्गाच्या दुस-या लाटेचा प्रादुर्भाव असुन रुग्णसंख्या कमी करण्याबाबत महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. रुग्ण किंवा नागरिक यांचा मृत्यु झाल्यास मयताचे नातेवाईकांस मृत्यु दाखला मिळविण्यासाठी सतत रुग्णालयात जावे लागते.
त्यामुळे निरोगी व्यक्तींना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका उद्भवू शकतो. त्या अनुषंगाने महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी मयताचे मृत्यु दाखले संबंधित नातेवाईकांकडे कोरोनाविषयक शासकीय नियमांचे पालन करुन घरपोच उपलब्ध करुन देणेबाबतची कार्यवाही करावी, असे पत्र आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे.