१८ ते ४४ वर्षावरील नागरीकांच लसीकरण नियमित वेळेतच…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १०. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. १०) रोजी ०८ लसीकरण केंद्रावर नोंदणी केलेल्या १६०० लाभार्थ्यांपैकी १५४४ लाभार्थींना व इतर लसीकरण केंद्राच्या ठिकाणी वय वर्षे ४५ च्या वरील ८२२१ लाभार्थींना लसीकरण करण्यात आले आहे.
उद्या मंगळवारी १८ ते ४४ वर्षावरील नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, प्रेमलोक पार्क दवाखाना, यमुनानगर रुग्णालय, डोळ्यांचे हॉस्पिटल –मासुळकर कॉलनी, पिंपळे निलख पी.सी.एम.सी स्कुल, नवीन आकुर्डी रुग्णालय व आहिल्यादेवी होळकर स्कुल सांगवी या आठही लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी नोंदणी केलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
तसेच शासनाकडून लस साठा उपलब्ध न झाल्यामुळे उद्या दि.११/०५/२०२१ रोजी लस साठा उपलब्ध नसल्यामुळे वय वर्षे ४५ च्या वरील कोणत्याही नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही.