- पालिकेचे माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. मे. २०२१) :- पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या सहमुख्य कार्यकारी अधिकारी पदातून मुक्त करण्याची विनंती महापालिकेचे मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
पोमण यांच्याकडे स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार आहे. ते केंद्र शासनाच्या आयटी विभागाच्या संचालक या पदावर प्रतिनियुक्तीसाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे त्यांनी कार्यमुक्त करण्याची विनंती आयुक्तांकडे केली आहे.