- डोळ्यांना संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात म्युकर मायकोसीस आजार होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आत्तापर्यंत ३३ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. तर दिवसाकाठी ४ रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जात आहे. वायसीएममध्ये त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. मधुमेह असणाऱ्या व कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसीसचा आजार बळावत आहे.
पहिल्या लाटेत सुमारे ७ ते ८ रुग्ण या आजाराचे आढळले होते. मात्र दुसऱ्या लाटेत ही संख्या वाढताना दिसत आहे. या आजारावर उपचार घेण्यासाठी वायसीएम रुग्णालयात रुग्ण दाखल होत आहेत. अनेक रूग्णांवर शस्त्रक्रिया करावी लागत असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. अनेकांचा रक्त पुरवठा खंडित झालेला असतो. त्यामुळे तोंडामध्ये बुरशीजन्य पदार्थ वाढत आहेत. वाढलेली बुरशी काढावी लागते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर रक्त पातळ होण्याच्या गोळ्या दिल्या जात आहेत. सध्या रुग्णालयाकडे या आजरावर उपचार करण्यासाठी औषधे, तज्ञ डॉक्टर व पुरेशी यंत्रणा असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
सध्या दिवसाकाठी ४ रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. यामध्ये वरचा जबडा, डोळे आदींच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. आद्यपपर्यंत सुमारे २० शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तर डोळ्यांना संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
– डॉ. यशवंत इंगळे, विभागप्रमुख, दंतरोग विभाग, वायसीएम.


















