न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. मे. २०२१) :- कोविड १९ संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छता राखणे आवश्यक आहे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येवूनही रस्त्यावर उघड्यावर कचरा टाकणा-या भोसरी नाशिक हायवेवरील जयहिंद मेडीको या मेडीकल धारकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
मेडिकल धारकाकडून र.रु .१०,००० / – दंड वसूलीची कारवाई क क्षेत्रिय कार्यालयाचे सहा.आयुक्त अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.आरोग्य अधिकारी बी.बी. कांबळे व मुख्य आरोग्य निरिक्षक विजय दवाळे यांच्या पथकामार्फत करण्यात आली.
कोविड संसर्ग टाळण्यासाठी शहराचा परिसर स्वच्छ ठेऊन नागरिकांनी थुंकू नये व उघड्यावर कचरा टाकू नये, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.