तहसीलदारांच्या पथकाकडून सिलिंडरसह कंपनीला टाळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. मे. २०२१) :- भोसरीतील आकार लेझर इंडस्ट्रिज व जे ब्लाॅकच्या सुपर टेक या कंपनीत आँक्सिजनचा औद्योगिक वापर होत असल्याची माहिती मिळाली. कंपनीत ऑक्सिजनच्या दोन सिलेंडरचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. ते दोन्ही सिलेंडर तसेच कंपनी ‘सील’ करण्यात आली.
सुपर टेक या कंपनीतही ऑक्सिजनचे तीन सिलेंडर मिळून आले. त्यातील दोन सिलेंडर मोकळे होते तर एका सिलेंडमध्ये ऑक्सिजन होता. ते तीनही सिलेंडर सील करण्यात आले असून, उद्योग विभागाने जप्त केले आहेत.
पिंपरी-चिंचवडच्या तहसीलदार गीता गायकवाड, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, भोसरीचे मंडलाधिकारी गणेश सोमवंशी, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी गवारे, राज्याच्या उद्योग विभागाचे पुणे येथील सहसंचालक सदाशिव सुरवसे यांच्या संयुक्त पथकाने शनिवारी (दि. १५) रोजी ही कारवाई केली.