- विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. मे. २०२१) :- अज्ञात वाहन चोरट्यांनी शहरातून तीन दुचाकी चोरून नेल्या. चिखली पोलीस ठाण्यात एक तर चाकण पोलीस ठाण्यात दोन गुन्हे रविवारी (दि. १६) दाखल करण्यात आले.
राजेश विश्वोनाथ यादव (वय ४१, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीने त्यांची सात हजार रुपये किमतीची दुचाकी टाटा मोटर्स कंपनीचे के ब्लॉक मटेरियल गेट, जुने आरटीओ कार्यालय, केएसबी चौक चिखली रस्ता येथे पार्क केली होती. चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. वाहनचोरीचा हा प्रकार शनिवारी (दि. १५) दुपारी सव्वादोन ते रात्री अकराच्या दरम्यान घडला.
राजू मोहन राठोड (वय २७, रा. गवतेवस्ती, मेदनकरवाडी, चाकण) यांनी चाकण ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीने त्यांची २० हजार रुपये किमतीची दुचाकी त्यांच्या राहत्या घराच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. वाहनचोरीचा हा प्रकार शनिवारी (दि. १५) रात्री साडेआठ ते रविवारी दि. १६ पहाटे हा प्रकार घडला.
शिवराम मारुती सातपुते वय ५१, रा. नाणेकरवाडी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीने त्यांची २० हजार रुपये किमतीची दुचाकी त्यांच्या राहत्या घराजवळ रविवारी (दि. १६) पार्क केली होती.

















