- नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांतर्गत श्वसनरोग चिकित्साशास्त्र, कम्युनिटी मेडिसीन, त्वचारोग मेडिसीन आणि नेत्र चिकित्साशास्त्र हे ४ नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.
या ४ विषयांसाठी विद्यापीठ संलग्नीकरण संमतीपत्राला मुदतवाढीकरिता ८ लाख रुपये शुल्क भरावे लागणार आहेत. वायसीएम रुग्णालयात ९ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू आहेत. नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत त्याला परवानगी मिळाली.
वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाच्या पत्रानुसार, वायसीएम रुग्णालय पदव्युत्तर संस्थेत श्वसनरोग, चिकित्साशास्त्र, कम्युनिटी मेडिसीन, त्वचारोग मेडिसीन आणि नेत्र चिकित्साशास्त्र हे ४ नवीन अभ्यासक्रम प्रतिविषय ६ विद्यार्थी प्रवेश क्षमतेसह सुरू करण्यात येणार आहे.


















