प्राधिकरणाची शुक्रवारची सभा अंतिम सभा असण्याची शक्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. मे. २०२१) :- पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या विलीनीकरणानंतर अंतर्गत हालचाली जोरदार सुरु झाल्या आहेत. प्राधिकरणाचे इतर कामकाज बाजूला ठेवून विलीनिकरणाबाबतची कागदपत्रे तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यात शुक्रवारी (दि. २१) होणारी सभा ही प्राधिकरणाची अंतिम सभा असण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात अध्यादेश प्राप्त होऊन अधिकृत स्थलांतर सुरू होईल, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
प्राधिकरणाची गुरुवारी सभा बोलविण्यात आली आहे. त्यात प्राधिकरणाच्या अंतर्गत असणाऱ्या शैक्षणिक भूखंडावर चर्चा होणार आहे. प्राधिकरणाचे ११ भूखंडापैकी चार भूखंड निवीदा पद्धतीने देण्यात आले आहेत. या अनुषंगाने पेठ क्रमांक ९, ११, २९ आणि ३२ या चार ठिकाणांचे शैक्षणिक भूखंड देण्यात आले असून, त्या पोटी प्राधिकरणाला महसूल प्राप्त झाला आहे.
दरम्यान, या व्यतिरीक्त प्राधिकरणाच्या सभेपुढे एकही विषय ठेवण्यात आला नाही. त्यामुळे जुन्या कामाचा निपटारा करण्यावर भर देण्यात आला आहे. आत्तापर्यंत प्राधिकरणाच्या ३५० सभा झाल्या आहेत. तर गुरुवारी ३५१ सभा होणार आहे. पुढील आठवड्यापर्यंत प्राधिकरण विलीनिकरण होण्याची प्रशासकीय मान्यता मिळू शकते. त्यामुळे ही सभा शेवटीची होण्याची शक्यता आहे. प्राधिकरणात सद्य:स्थितीत २३ कर्मचारी ठेकेदार नियुक्त आहेत. तर, सहा कर्मचाऱ्यांना शासनाच्या विविध विभागांत सामावून घेतले आहे.