- उद्योजक व जनसेवक अरुण पवारांची धाव..
- माकडांच्या उदरनिर्वाहासाठी फळ व अन्नपदार्थाची मदत..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. मे. २०२१) :- कोरोनामुळे गतवर्षीपासून भुम-परांडा तालुक्यातील सोनारी गावच्या माकडांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब हेरून मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष तथा उद्योजक अरुण पवार यांनी पाचशे ते सहाशे माकडांना पंधरा ते वीस दिवस सहज पुरेल इतके शेंगदाणे, फुटाणे, काकडी, टोमॅटो, चिक्कु, कलिंगड, पेरु आणि खरबूज असे खाद्यपदार्थ सोनारीत पोहोच केले.
याबाबत माहिती देताना अरुण पवार म्हणाले, सोनारीतील काळभैरवनाथ मंदीर माकडांसाठी प्रसिद्ध आहे. तब्बल दीड हजारांहून अधिक माकडे येथे वास्तव्यास आहेत. अनेकवेळा दुष्काळाच्या झळा या जीवांना भोगाव्या लागतात. या जीवांना खाद्य आणि पाण्यासाठी भटकंती करावी लागते. कोरोनामुळे येथील भाविकांची ये – जा थांबली आहे. मुक्या प्राण्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्राणीसेवा हीच ईश्वरसेवा समजून या प्राण्यांच्या उदरनिर्वाहासाठी काही फळ व अन्नपदार्थ सोनारी या तीर्थक्षेत्राला पोहोच केले. त्यामुळे या माकडांची काही दिवसांची अन्नासाठीची वणवण थांबणार आहे.
या प्रसंगी अभिषेक पवार, डोंजे गावचे मा. सरपंच गजेंद्र भोरे, सागर भोरे, श्रीपत, पिंपरीचे विद्यमान सरपंच रामराजे ताकभाते, ग्रामपंचायत सदस्य बापु तापकीरे, गुळपोळी गावचे मा. सरपंच महादेव चिकणे तसेच पिंपरी-चिंचवड येथील उद्योजक बाळासाहेब काकडे हे मान्यवर उपस्थित होते.
“भैरवनाथ जोगेश्वरी अन्नछत्र मंडळ ट्रस्ट”चे अध्यक्ष महेश कारकर, अविनाश हांगे, प्रकाश जगताप, अशोक माने, रविंद्र खुळे, भिमा घाडगे, सागर वायकर, सज्जन गोसावी, योगेश बनसोडे, ब्रम्हदेव वाडेकर आदी पदाधिकाऱ्यांनी उद्योजक अरुण पवार यांचे आभार मानले.