- अवैधरित्या हुक्का पार्लरप्रकरणी पोलिसांची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. मे. २०२१) :- कासारवाडीतील नाशिक फाटा, फुगे कॉम्प्लेक्सच्या टेरेसवर निसर्ग हॉटेलमध्ये अवैधरित्या हुक्का पिण्यासाठी ग्राहकांना एकत्र जमवले. हुक्का पिण्यासाठी लागणारे साहित्य आरोपीने पुरवले. या हुक्का पार्लरवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई केली.
आरोपींच्या ताब्यातून २१ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस कर्मचारी अनिल महाजन यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हॉटेल चालक गणेश नामदेव गोडसे (वय ३१, रा. भोसरी गावठाण), केतन सुखदेव वाघचौरे (वय २९, रा. सांगवी), शिवम शांताराम खोसे (वय २२, रा. मोशी), राहुल भिमराव लोखंडे (वय २८, रा. थेरगाव), महेश राजेश निकम (वय २३, रा. पिंपरी), नितीन हिरामण गोडसे (वय ४५, रा. लांडेवाडी, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.