- खातेनिहाय चौकशीचे आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. मे. २०२१) :- महापालिकेने कोविड १९ कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पालिका शाळेतील सहा. शिक्षिका अस्मिता माधव गुरव यांना निलंबित करण्यात आले आहे.
अस्मिता माधव गुरव यांना Field Surveillance Team ची स्थापना करुन त्या Team मध्ये काम करण्याचे आदेश दि.०३/०५/२०२१ अन्वये करण्यात आली होती. परंतू, त्यांनी सदरचे महत्वपूर्ण कामकाज करण्यास नकार दिला. वाद घालून, कर्मचाऱ्यांशी बेशिस्त वर्तन करुन व्हिडीओ वायरल करण्याची धमकी दिली.
वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाची अवज्ञा केलेली बाब ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, तालेरा रुग्णालय यांनी निदर्शनास आणून दिलेली आहे. या प्रकरणी त्यांना सेवानिलंबित करण्यात येवून व त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार आहे.


















