- बालरोग वैद्यकीय तज्ञांची टास्क फोर्स सांभाळणार आघाडी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात कोविड-१९ या संसर्गजन्य रोगाच्या तिसऱ्या लाटेसंबंधी वैद्यकीय तज्ञांनी धोक्याची सूचना दिली आहे. त्यामध्ये लहान मुले जास्त प्रमाणात बाधित होण्याची शक्यता वर्तविली आहे. या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेवून पालिकेच्या व खाजगी रुग्णालयातील बालरोग वैद्यकीय तज्ञांची कृतीदल (Task Force) समिती स्थापन करण्याचा निर्णय आयुक्त राजेश पाटील यांनी घेतलेला आहे.
त्यात लहान मुलांचे कोविड-१९ वरील उपचार, लहान मुलांची ICU व्यवस्था तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना, संचलन याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
त्यानुसार डॉ. दिपाली अंबिके-प्राध्यापक-बालरोग विभाग-यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, डॉ. शरद अगरखेडकर-प्राध्यापक-बालरोग विभाग- डॉ. डी. वाय. पाटील मेडीकल कॉलेज, डॉ. राहुल कल्याणपुरकर-निओ-न्युटोलॉजिस्ट-आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल, डॉ. सुधीर माळवदे-निओ न्युटोलॉजिस्ट-युनिक हॉस्पिटल, डॉ. मनोज पाटील-बालरोग इटेन्सीव्हीस्ट-स्टर्लिंग हॉस्पिटल, डॉ. संदीप शिंदे-बालरोग तज्ञ-स्टर्लिंग हॉस्पिटल या महापालिका व खाजगी रुग्णालयातील वैद्यकीय तज्ञ अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


















