- अंत्यसंस्कारसाठी लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्यावर भरारी पथक दाखल करणार फौजदारी..
- महापलिका आयुक्त राजेश पाटलांचा आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरातील खासगी रुग्णालयात रेमेडिसीविर इंजेक्शनचा गरज असलेल्या रुग्णांसाठी वापर होतो? त्याचा अनावश्यक वापर तर होत नाही ना? रुग्णालयांमध्ये प्राप्त झालेल्या रेमेडिसीविर इंजेक्शनचा साठा व वापर किती? यासह रुग्णालयातील वैद्यकीय कागदपत्रांची तपासणी करुन अनियंत्रित वापर करणाऱ्या रुग्णालयांवर नियमानुसार कारवाई होणार आहे
त्यासाठी पालिकेने सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांच्या नियंत्रणाखाली भरारी पथकाची नेमणूक केली आहे. त्यांच्यामार्फत रुग्णालयांना अचानक भेटी देवून रेमेडिसीविर इंजेक्शनबाबतची तपासणी करण्यात येणार आहे.
त्याशिवाय स्मशानभूमीमध्ये कोरोना-१९ प्रादुर्भावामुळे मृत झालेल्या रुग्णांचे पारंपारिक पध्दतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. अशा आशयाचा फलक स्मशानभूमीच्या दर्शनी भागावर लावणेची कार्यवाही क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी यांनी करावी.
कोरोना-१९ प्रादुर्भावामुळे मृत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडे पैशाची मागणी करणे, अथवा तशा तक्रारी येवू नयेत यासाठी महापालिकेच्या सुरक्षा विभागाने अचानक गस्त घालून पाहणी करावी. अशा पध्दतीचे गैरकृत्य करताना आढळून आल्यास अथवा तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश महापलिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.


















