- तज्ञ गटाच्या समितीकडून केंद्र सरकारला लसीकरणाबाबतच्या सूचना..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे. २०२१) :- नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अॅडमिनीस्ट्रेशन फॉर कोविड १९ (NEGVAC) या तज्ज्ञ गटाच्या समितीने दिलेल्या सूचनांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हिरवा झेंडा दाखवला आहे. पहिला डोस घेतल्यानंतर करोनाची लागण झाल्यास दुसऱ्या डोस करोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांनी घेण्याची सूचना देण्यात आली आहे.
करोनामुक्त व्यक्तीला अँटीबॉडी किंवा प्लाझा दिले गेलेत. त्यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याच्या तीन महिन्यानंतर करोनाची लस घेण्यास सांगितलं आहे.
गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना ४ ते ८ आठवडे प्रतीक्षा करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच गर्भवती महिलांनी लस घ्यावी की नाही याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरच याबाबत निर्णय होईल असं सांगण्यात आलं आहे.


















