- पिंपरी चिंचवड शहरात उद्या कोविड लसीकरण बंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस शासनाकडून लस साठा उपलब्ध न झाल्यामुळे उद्या गुरुवारी (दि.२०) रोजी कोणत्याही वयोगटातील नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही. दरम्यान महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर आज ५८६९ लाभार्थींना लसीकरण करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद असलेने लसीकरण केंद्राच्या परिसरामध्ये गर्दी करु नये व महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका कार्यक्षेत्रामधील नागरीकांना पालिकेने केले आहे.


















