न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे. २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. १९) रोजी ७६२ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १९०० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २४३९४७ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २२६३९९ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ३७७५ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ४२ एवढी आहे.


















