- कोविड तपासणीसाठी पालिकेचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात नागरिकांची कोविड-१९ रॅपिड अँटीजन टेस्टचे नमुने तपासण्याची सुविधा ठराविक केंद्रावर उपलब्ध आहे. या केंद्रावर करण्यात येणा-या तपासणीची वेळ पालिकेने वाढविली आहे.
पिंपरीच्या संत तुकारामनगर मधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात सकाळी ८.०० ते रात्री ८.००, पिंपरीच्या कमला नेहरु मराठी शाळेजवळच्या जुन्या जिजामाता रुग्णालयात सकाळी ८.०० ते रात्री ८.०० व संभाजीनगर, बी.एस.एन.एल ऑॅफिस आर.टी.टी.सी सेंटरमध्ये सकाळी ९.०० ते रात्री ९.०० पर्यंत वेळ ही सुधारित वेळ असणार आहे.


















