- चिखली पोलिसांनी चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. मे. २०२१) :- दोन लाख रुपये किंमतीची रिक्षा फिर्यादीने (एम एच १४ / एच एम ८१७१) त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. रात्रीच्या वेळी चोरट्यांनी रिक्षाचे लाॅक तोडले.
वायरच्या साह्याने डायरेक्ट करून रिक्षा चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. १८) रात्री साडेदहा ते बुधवारी (दि. १९) पहाटे तीन वाजताच्या कालावधीत घडली.
याबाबत अशोक भाऊसाहेब पवार (वय ३४, रा. कृष्णा हाऊसिंग सोसायटी, मोरेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगेश शांताराम यादव (वय २१, रा. चिखली गाव. मूळ रा. वाशिम), शिवराज एकनाथ मोरे (वय ३२, रा. पाटीलनगर, चिखली), अवधूत चंद्रसेन लवटे (वय २५, रा. पाटीलनगर, चिखली) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.


















