- वयोवृद्ध व अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना घरपोच कोविड लस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. मे. २०२१) :- कोवीड लसीकरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी व अनावश्यक गर्दी आणि गैरसोय टाळण्यासाठी, महापालिकेने अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी, १ मेपासून कोवीड लसीकरण सुरू आहे.
लस पुरवठ्यातील अनियमितता, पहिला डोस व दुसरा डोस यासंबंधी नागरिकांमध्ये असलेला संभ्रम, यामुळे होणारा मनस्ताप टाळणे यासाठी व प्रभावी लसीकरणासाठी पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काही उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार परिपत्रकाद्वारे संबंधितांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
- लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी नोंदणी केलेले लाभार्थी वगळता इतरांना शंभर मीटरच्या आत प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. पण दिव्यांग व जेष्ठ नागरिक आपल्या सोबत एक मदतनीस आणू शकतील.
- लसीसाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यामध्ये दिव्यांग नागरिक प्रथम, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, मग दुसऱ्या डोसचे लाभार्थी, त्यानंतर इतर लाभार्थी. अशा क्रमाने दैनंदित लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
- कोविशील्ड की कोवँक्सिन यापैकी कोणती लस उपलब्ध आहे. पहिला अथवा दुसरा, कोणता डोस दिला जाणार आहे. याबाबतची माहिती दररोज फलकावर नागरिकांना पाहायला मिळणार आहे.
- दिव्यांग व्यक्तीला आवश्यकतेनुसार व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
- ज्यांना ऑनलाईन नोंदणी करता येत नाही. अशांसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण, प्रभाग स्तरावर देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
- जे लाभार्थी लसीकरण केंद्रापर्यंत येऊ शकत नाहीत. अशा वयोवृद्ध व अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना, त्यांच्या घरी लस देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी ‘मी जबाबदार ‘ या अँपवर नोंदणी करण्याची आवश्यकता आहे .
- ज्यांना कोवीड होऊन गेला आहे. त्यांना तीन महिन्यानंतर लस देण्यात येईल
- सर्व स्तनदा मातांना लस देण्यात येईल.
- लसीकरणाच्या वेळी कायदा सुव्यवस्था व शिस्तीसाठी पोलीस दलाची मदत घेण्यात आली आहे.