- वय वर्षे १८ ते ४४ वयोगटासाठी लसीची प्रतीक्षा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरातील ज्या लाभार्थ्यांनी पूर्वी कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना डोसनंतर १२ ते १६ आठवड्यांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यंत) या निकषानुसार उद्या (दि. २१) रोजी लसीकरण होणार आहे.
पालिकेच्या लसीकरण केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस सकाळी १० ते सायं. ५.३० या कालावधीत देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक लसीकरण केंद्रावर वय वर्ष ४५ पुढील नागरिकांसाठी १५० डोस उपलब्ध असणार आहेत.
यमुनानगर रुग्णालय, तालेरा रुग्णालय, सावित्रीबाई फुले शाळा, भोसरी, नवीन जिजामाता रुग्णालय, आचार्य आत्रे सभागृह, वायसीएम रुग्णालय, खिंवसरा पाटील रुग्णालय, थेरगाव, नवीन आकुर्डी रुग्णालय, आहिल्यादेवी होळकर स्कुल, सांगवी रुग्णालय या केंद्रावर हे लसीकरण होणार आहे.
वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थीच लसीकरण करण्यात येणार नाही. त्यामुळे वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.


















