न्युज पीसीएमसी नेटवर्क : नवी दिल्ली : दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि आमदार अजित पवार गैरहजर आहेत. अजित पवार बैठकीला असल्याने उपस्थितांमध्ये त्यांच्या गैरहजेरीबाबत चर्चा सुरू झाली आहे.
पक्षातील गटबाजीमुळे अजित पवार हे नाराज आहेत असं काहींचं म्हणणं आहे. या नाराजीमुळेच त्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याचं सांगण्यात येत आहे. अजित पवार हे बैठकीतील गैरहजेरीमुळे होणाऱ्या चर्चा लक्षात घेता विदेशात गेले असल्याचंही काहींचं म्हणणं आहे.













