न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर उद्या शनिवारी (दि. २२) वय वर्षे ४५ पुढील ज्या लाभार्थ्यांनी पुर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे.
तसेच ‘कोव्हॅक्सिन’ चा दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने उद्या (दि.२२) रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘कोविशिल्ड’ पहिला व दुसरा तसेच ‘कोव्हॅक्सिन’ चा दुसरा डोस खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल. प्रत्येकी १०० डोस केंद्रावर उपलब्ध असणार आहेत. वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही.
यमुनानगर रुग्णालय
तालेरा रुग्णालय
सावित्रीबाई फुले शाळा भोसरी
नवीन जिजामाता रुग्णालय
आचार्य अत्रे सभागृह वायसीएम रुग्णालय जवळ
खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव
नवीन आकुर्डी रुग्णालय
कासारवाडी दवाखाना
‘कोव्हॅक्सिन’ लस फक्त दुसरा डोस लाभार्थी क्षमता…
नविन भोसरी रुग्णालय
आहिल्यादेवी होळकर स्कुल सांगवी रुग्णालय जवळ
यमुनानगर रुग्णालय
तालेरा रुग्णालय


















