- फेसबुक, व्हॉट्सअॅपवर न्यूड कॉल व्हायरल करण्याची तरुणाला धमकी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. मे. २०२१) :- रात्रीच्या सुमारास एका अनोखळी व्हॉट्सअॅप क्रमांकावरुन एका तरुणीने हाय असा मेसेज पाठवला. काही क्षणाचा ही विलंब न करता फिर्यादी तरुणाने तरुणीला रिप्लाय दिला. त्यांच्यात अवघ्या पंधरा मिनिटांचा संवाद झाला आणि यातून थेट तरुणीने न्यूड व्हिडिओ कॉल करू का अशी विचारणा केली. तरुणाने देखील होकार देत न्यूड कॉलची विनंती स्वीकारली.
हे सर्व सुरू असताना दोघेही नग्नावस्थेत होते. तरुणीने तरुणाचा न्यूड कॉल रेकॉर्ड केला. त्यावरून तरुणाला तुझा न्यूड कॉल युट्युब, फेसबुक, नातेवाईक, व्हॉट्सअॅपवरून व्हायरल करण्याची धमकी देत पाच हजारांची मागणी केली.
तरुणांकडे पैसे नसल्याने २४ वर्षीय तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली असून संबंधित तरुणीविरोधात माहिती तंत्रज्ञान काद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


















