- एचसीएमटीआर विकसन प्रकल्पाचे उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सादरीकरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील उच्चक्षमता द्रुतगती मार्गांचे (एचसीएमटीआर) विकसनाबाबत सादरीकरण करण्यात आले. महापालिका हद्दीमध्ये ३० किमी लांबीचा व ३० मीटर रुंदीचा एचसीएमटीआर मंजूर विकास आराखड्यामध्ये समावेश आहे.
हा मार्ग करीत असताना दाट लोकवस्तीने व्यापलेल्या भागातील लोकांची घरे न पाडता या मार्गाचे विकसन पूर्ण करणे शक्य होणार आहे. निओ मेट्रो प्रणालीमध्ये रबर टायर असलेल्या व ओव्हरहेड इलेकट्रिकल सप्लाय असलेल्या सुमारे २५० प्रवासी क्षमता असणाऱ्या जोडबस राखीव उन्नत मार्गाचा वापर करून प्रवाश्यांची ने आण करणार आहेत.
पुढे भविष्यात संख्या वाढल्यास सदरचा मार्ग लाइटरेल मार्गामध्ये रुपांतरित करता येईल, असे नियोजन करण्यात आले आहे. निओ मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र व राज्य शासन यांचा सहभागाने करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी दिली.
















