- बँक खाते अपडेट करण्याचे परिवहन विभागाचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. मे. २०२१) :- राज्यात संचारबंदी व कडक निर्बंध लागू केल्यानंतर परवानाधारक रिक्षा चालकांना दीड हजार रुपयांची आर्थिक मदतीची घोषणा राज्य शासनाने केली. शनिवारपासून (दि.२२) रिक्षाचालकांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल, अशी माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली.
परिवहन विभागाने सर्व परवानाधारक रिक्षाचालकांना आपले बँक खाते अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे परवानाधारकांना थेट खात्यात अनुदान मिळणे सोपे होणार आहे. राज्यात सुमारे ७ लाख २० हजार परवानाधारक रिक्षाचालक असून त्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे.
वाहन विभागाच्या संकेतस्थळावर याबाबतची लिंक उपलब्ध होणार आहे. रिक्षाचालकांनी ऑनलाइन माहिती भरल्यानंतर त्याची तपासणी होईल. त्यानंतर परवानाधारकांच्या खात्यात काही मिनिटांत ऑनलाइन रक्कम जमा होईल, असे परिवहन खात्याकडून सांगण्यात आले.
















