- अन्यथा त्या रुग्णालयांना पालिकेचा फौजदारीचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. मे. २०२१) :- परवान्याचे नूतनीकरण न केलेल्या शहरातील ९ खासगी रुग्णालयांना पिंपरी चिंचवड महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटीस मिळाल्यापासून ३ दिवसांच्या आत नूतनीकरण न केल्यास फौजदारी कारवाईचा इशारा त्यात देण्यात आला आहे. तर, २१ रुग्णालये बंद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
येत्या तीन दिवसांत नोंदणी व परवाना प्रमाणपत्रांचे नूतनीकरण न केल्यास बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अॅक्ट १९४९ च्या नियम क्रमांक तीननुसार कायदेशीर कारवाईचा इशारा पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिला आहे.
त्यात सांगवीतील शासनाचे पुणे उरो रुग्णालय व जिल्हा जनरल रुग्णालय, दिघीतील विठ्ठल मंदिराशेजारचे श्री साई रुग्णालय, थेरगावातील काळेवाडी फाटा येथील तिकोणे रुग्णालय, मोशीतील नागेश्वर हायस्कूल शेजारचे श्री रुग्णालय, बेलटिकानगर थेरगावातील गजानन रुग्णालय, विकासनगर-किवळेतील माऊली रुग्णालय, आदर्शनगर-दिघीतील श्री साई रुग्णालय, काळेवाडीतील ओम रुग्णालय या रुग्णालयांचा समावेश आहे.


















