- आंद्रा-भामा आसखेड धरणाच्या पाण्याला कोणाचे ग्रहण..
- नगरसेवक अजित गव्हाणेंची पालिका सभेत जोरदार फटकेबाजी….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. मे. २०२१) :- पुढील सात ते आठ महिन्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आत्तापासून पाण्याच्या विषयात खोलात जाऊन अभ्यास करावा. पाणी पुरवठ्याच्या कामाला गती द्यावी अशी सूचना नगरसेवक गव्हाणे यांनी केली.
पिंपरी महापालिकेची सर्वसाधारण गुरुवारी ऑनलाइन पध्दतीने पार पडली. या सभेत नगरसेवक अजित गव्हाणे बोलत होते. ते म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराची भविष्यातील सन २०४५ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन राज्य सरकारने आंद्रा धरणातून १०० एमएलडी आणि भामा आसखेड धरणातून १६७ एमएलडी असे एकूण २६७ एमएलडी पाणी कोटा शहरासाठी सन २०११ मध्ये आरक्षित केला. त्याची मुदत संपल्याने २०१८ मध्ये पुन्हा कोटा आरक्षित केला.
पुणे आणि पिंपरी महापालिकेच्या पाणी आरक्षण कोट्याला एकाचवेळी मान्यता मिळाली होती. पुणे महापालिका खेडवरून पाणी उचलत पिंपरी-चिंचवडला ओलांडून पुणेकरांना पाणी देण्यात यशस्वी झाली. पण, २०२१ उजाडले तरी पिंपरी महापालिका शहरासाठी पाणी आणू शकली नाही. त्याकामी मोठी दिरंगाई झाली. पाणीपुरवठयासारख्या महत्वाच्या प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. आंद्रा-भामातून नवलाख उंब्रे येथे पाणी आणले जाणार आहे. तेथून पिंपरी-चिंचवडमध्ये बंद पाईपलाईनमध्ये पाणी आणण्याचे ठरले होते. त्यानुसार काम करावे. कामाला गती देणे आवश्यक आहे. पवना बंद जलवाहिनीसारखी त्याची परिस्थिती होऊ नये याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.


















