- वेळेतही वाढ; कोविड तपासणीचे पालिकेचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. मे. २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात नागरिकांची कोविड-१९ रॅपिड अँटीजन टेस्टचे नमुने तपासण्याची सुविधा ठराविक केंद्रावर उपलब्ध आहे. या केंद्रावर करण्यात येणा-या तपासणीची वेळ पालिकेने वाढविली आहे.
आर.टी.टी.सी सेंटर, बी.एस.एन.एल ऑॅफिस, संभाजीनगर सकाळी – ९.०० ते रात्री- ९.००, तालेरा रुग्णालय, तानाजीनगर, चिंचवडगांव – सकाळी- ९.३० ते सायं- ५.००, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकारामनगर पिंपरी-सकाळी – ८.०० ते रात्री- ८.००, बालभवन, खराळवाडी दवाखाना शेजारी, खराळवाडी-सकाळी- ९.०० ते दुपारी- ३.३०, जुने जिजामाता रुग्णालय, कमला नेहरु मराठी शाळेजवळ, पिंपरी-सकाळी – ८.०० ते रात्री- ८.००, भोसरी रुग्णालय, पी.सी.एम.टी. चौक, भोसरी-सकाळी- ९.०० ते दुपारी- ३.००, यमुनानगर रुग्णालय, निगडी-सकाळी – ८.०० ते रात्री- ८.००, म्हेत्रेवस्ती दवाखाना, म्हेत्रेवस्ती पोलीस चौकी जवळ-सकाळी – ९.०० ते दुपारी- १.००, खिंवसरा पाटील, थेरगांव रुग्णालय, म.न.पा.जलतरण तलाव जवळ, थेरगांव-सकाळी – ९.०० ते दुपारी- ४.००, बॅटमिंटन हॉल, जलतरण तलावा जवळ, काटेपुरम चौक, पिंपळे गुरव-सकाळी- ९.३० ते सायं- ४.०० या लसीकरण केंद्रावर ही सुधारित वेळ असणार आहे.
कोविड-१९ तपासणी केंद्रावर निश्चित केलेल्या वेळेमध्ये Rapid Antigen Tests ची सुविधा पिंपरी चिंचवड शहरामधील नागरिकांसाठी दररोज उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या सेवेचा जास्तीत जास्त लाभ पिंपरी चिंचवड शहरामधील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.


















