- पाच जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. मे. २०२१) :- व्याजाच्या पैस्यासाठी एकाला दमदाटी करुन खंडणी मागितली. पैसे वेळेत फेडू शकल्याने मारहाण केली. पिंपरीत ही घटना घडली. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी करण मनोज तुलसानी (वय २०, रा साईबाबा मंदिर जवळ, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. विकास किर, सचिन सौदे, विजय सौदे (सर्व रा. काळेवाडी), विक्की भोरे (रिव्हर रोड, पिंपरी) व खुपचंद मंगताणी उर्फ बुग्गी (रा. वैभवनगर, पिंपरी) यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून फिर्यादीने व्यवसायासाठी पन्नास हजार रुपये २५ टक्के व्याजाने २० दिवसांसाठी घेतले होते. फिर्यादी हे वीस दिवसांत पैसे परत न फेडु शकल्याने प्रतिदीन दोन हजार रुपये या प्रमाणे ४० दिवसांचे ऐंशी हजार रुपये जादा घेवून फिर्यादीला शगुन चौक येथे बोलावून घेतले. पिंपरीतील मृणाल लॉन्स, वैभवनगरमध्ये नेले. आताचे आत्ता पैशे दे नाहीतर तुला धंदा करु देणार नाही, अशी धमकी देवून मारहाण केली व मुद्दल पन्नास हजाराबद्दल व्याजासह ६५,००० रुपये घेवून पुन्हा आरोपीने फिर्यादीला दमदाटी करुन जबरदस्तीने कधी हजार तर कधी दोन हजार रुपये दुकानात नेले. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.


















