- नंतर लग्नास नकार; आरोपीला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. मे. २०२१) :- महिलेच्या वर्गमित्राच्या वाढदिवसानिमित्त वर्गमित्राने महिलेला निगडी परिसरातील एका हाॅटेलमध्ये नेले. तू मला येथे का घेऊन आला आहेस, असे महिलेने विचारले. त्यावेळी त्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच मित्राचे ओळखपत्र दाखवून हॉटेलमधील रुम बुक केली. त्यानंतर तेथे महिलेची इच्छा नसतानाही त्यांच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
त्यानंतरही तरुणाने महिलेचा विश्वास संपादन करून निगडी, काळेवाडी, पिंपरी या वेगवेगळ्या ठिकाणावरील भाड्याच्या फ्लॅटवर नेले. तिथे नवरा बायकोसारखे राहून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
त्यानंतर महिलेने लग्लाबद्दल विचारल्यावर तिला मारहाण केली. महिलेने याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात रविवारी फिर्याद दिली आहे. राजकुमार सिध्दप्पा नागराळी (वय २५, रा. भोसरी), असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. निगडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

















