- आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती; निर्णय मात्र मुख्यमंत्रीच घेणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. मे. २०२१) :- १ जूननंतरही लॉकडाऊन वाढणार की शिथिलता येईल याबाबत सामान्यांमध्ये संभ्रमता आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
एबीपी माझानं दिलेल्या वृत्तानुसार, ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी आणि मृतांचा आकडा कमी असेल त्या-त्या जिल्ह्यांमध्ये १ जूननंतर लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देणार असल्याचं सांगितले.
तसेच निर्बंध शिथिल करण्यात येणार असले तरीही ते एकाचवेळी शिथिल होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. टप्प्याटप्प्यानं नियमांमध्ये शिथिलता दिली जाईल, असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर लॉकडाऊन संदर्भातले महत्त्वाचे निर्णय घेतले जातील असंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.


















