न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. मे. २०२१) :- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच विकेंड लॉकडाऊन करण्यात आला आहे. असे असतानाही बेशिस्त नागरिक घराबाहेर पडून नियमांचे उल्लंघन करत आहेत. अशाच पद्धतीने शनिवारी विनामास्क फिरणाऱ्या ४४८ नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली.
एमआयडीसी भोसरी (३६), भोसरी (११), पिंपरी (०७), चिंचवड (१५), निगडी (०३), आळंदी (४१), चाकण (०६), दिघी (१४), सांगवी (१०), हिंजवडी (३४), देहूरोड (२८), चिखली (१३), रावेत चौकी (०५), शिरगाव चौकी (१८), म्हाळुंगे चौकी (०१) या पोलीस ठाण्यांतर्गत पोलिसांनी शनिवारी ४४८ जणांवर कारवाई केली. नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून सातत्याने केले जात आहे.
















