- पतीच्या मदतीने मृतदेहाची लावली विल्हेवाट..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. मे. २०२१) :- सासू-सुनेच्या भांडणामध्ये सूनेने सासूचा ब्लाउजच्या सहाय्याने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह गोनीत बांधून चार दिवस टेरेसवर ठेवला त्यातून वास यायला लागल्यानंतर तीने पतीच्या मदतीने मृतदेह झुडपात टाकून दिला. ही विदारक घटना तळेगाव दाभाडे येथे शुक्रवारी घडली आणि रविवारी उघडकीस आली.
बेबी गौतम शिंदे (वय ५०), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पूजा मिलींद शिंदे (वय २२), मिलींद गौतम शिंदे (वय २९) असे याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या सून व मुलाचे नाव आहे.
बेबी आणि त्यांची सून पूजा यांच्यात नेहमीच भांडणे होत होती. भांडण झाल्यानंतर सासू सुनेच्या भांडणामध्ये सासूने सुनेला व नातवाला मारहाण केली. या रागातून सुनेने ब्लाउजच्या साहाय्याने सासूचा गळा आवळून खून केला. त्यांचा मृतदेह पोत्यात बांधून झुडपात टाकून दिला. याप्रकरणी सुनेसह तिच्या पतीला अटक केली आहे. रविवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
बेबी गौतम शिंदे (वय ५०), असे खून झालेल्या सासूचे नाव आहे. पूजा मिलींद शिंदे (वय २२), मिलींद गौतम शिंदे (वय २९), असे अटक केलेल्या आरोपी पत्नी व पतीचे नाव आहे. अमित गौतम शिंदे (वय २२, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात रविवारी फिर्याद दिली.


















