- काळेवाडीतील घटना; दोन जणांना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. मे. २०२१) :- समाजकार्य करीत असल्याचा राग मनात धरून एका तरुणावर कोयत्याने वार केले. याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. जय भवानी चौक, काळेवाडी येथे शुक्रवारी (दि. २१) रात्री ही घटना घडली.
प्रमोद दयानंद कांबळे (वय १९, रा. नखाते वस्ती, रहाटणी), ओंकार बाळू बोरेकर (वय २१, रा. आझाद कॉलनी, जय भवानी चौक, वाकड), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह महेश माने, राहुल मोरे, रोहित शिंदे यांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. अक्षय शिवाजी सोंडकर (वय २८, रा. रहाटणी काळेवाडी लिंक रोड, वाकड) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे समाजकार्य करतात. याबाबत आरोपी मनात राग धरून होते. फिर्यादी हे त्यांचा मावस भाऊ सागर कास्वीटे यांच्यासोबत असताना आरोपींनी संगनमत करून फिर्यादी व त्यांच्या मावस भावाला शिवीगाळ केली. तसेच कोयता, लाकडी दांडक्याने हाताने मारहाण करून गंभीर जखमी केले.
















